पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा रद्द

0

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतातर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबण्यात आले. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ तळं नष्ट केलेत. यामुळे सीमेवरील तणाव अधिकच वाढला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड या युरोपीय देशांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. भारताने पाकिस्‍तानवर केलेल्‍या एअर स्‍ट्राईकचे पंतप्रधान मोदी हे मॉनिटरींग करत होते. यावेळी त्‍यांच्यासोबत अजित डोवालही उपस्‍थित होते. ते पीएम मोदी यांना प्रत्‍येक वेळेची अपडेट देत होते. त्यामुळे हल्ल्यामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ कल्‍याण मार्ग येथून या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हे त्‍यांना प्रत्‍येक क्षणाची माहिती देत होते. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले.

पहलगाम हल्याच्या १४ दिवसांनंतर, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (सीसीएस) बैठक घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूर नंतरच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech