भारतीय नौदल म्हणजे अद्वितीय साहस आणि दृढनिश्चयाचे मूर्तिमंत उदाहरण – पंतप्रधान

0

नौदल दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या सर्व अधिकारी -जवान – कर्मचाऱ्यांना आजच्या नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपले नौदल म्हणजेच अद्वितीय साहस आणि दृढनिश्चयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आपल्या सागरी सीमा आणि सागरी कार्यक्षेत्राचे ते रक्षणकर्ते आहेत. मोदी म्हणाले, “आय एन एस विक्रांत वर नौदलाच्या जवानांबरोबर मी यावर्षी साजरी केलेली दिवाळी केवळ अविस्मरणीय आहे. भारतीय नौदलाला त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात लिहिले आहे, “भारतीय नौदलाच्या सर्व अधिकारी-जवान- कर्मचाऱ्यांना आजच्या नौदल दिनानिमित्त शुभेच्छा. आपले नौदल म्हणजेच अद्वितीय साहस आणि दृढनिश्चयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्या सागरी सीमा आणि सागरी कार्यक्षेत्राचे ते रक्षणकर्ते आहेत. गेल्या काही वर्षांत आपल्या नौदलाने आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेवर लक्ष केंद्रित केले असून आपल्या सुरक्षा व्यवस्थेत त्यामुळे खूप सुधारणा झाली आहे. आयएनएस विक्रांतवर नौदलाच्या जवानांबरोबर मी यावर्षी साजरी केलेली दिवाळी केवळ अविस्मरणीय होती. भारतीय नौदलाला त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech