नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कर्करोग झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यासंदर्भात बायडन यांच्या कार्यलयाकडून रविवारी(दि.१७) ही माहिती देण्यात आली. बायडन यांना प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर झाल्यानं त्यांची प्रकृती ढासाळत चालली आहे.यावर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांच्या आजाराबद्दल ट्विट करत काळजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हणाले की, “जो बायडेन यांच्या प्रकृतीबद्दल ऐकून खूप काळजी वाटली. त्यांनी लवकर आणि पूर्ण बरे व्हावे माझ्या सदिच्छा. या संघर्षाच्या काळात आम्ही सर्वजण डॉ. जिल बायडेन आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत,” अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ८२ वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लघवीचा त्रास होता. यासाठी शुक्रवारी बायडन यांची जेव्हा डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, जो बायडेन आणि त्यांचे कुटुंब डॉक्टरांशी उपचार पर्यायांवर चर्चा करत आहेत. बायडेन यांना झालेला हा आजार अधिक आक्रमक आहे. त्यामुळे त्यावर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक आहे.जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या आजारपणाच्या वृत्ताने समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.