नवी दिल्ली : ‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोस सरकार आणि तेथील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार १.४ अब्ज भारतीय तसेच भारत आणि बार्बाडोस यांच्यातील दृढ संबंधांना समर्पित केला आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात; “या सन्मानासाठी बार्बाडोस सरकार आणि तेथील जनतेचा आभारी आहे. मी हा पुरस्कार माझे १.४ अब्ज देशवासीय तसेच भारत आणि बार्बाडोस यांच्यातील दृढ संबंधांना समर्पित करतो.”