पुणे : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बिलासाठी मृतदेह तब्बल ८ तास अडवून ठेवल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आलीय. पूना हॉस्पिटलमध्ये शहरी गरीब योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाचा शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास मृत्यू झाला होता. पण या योजनेंतर्गत बिल सकाळी साडे आठ नंतर तयार होईल असं सांगत मृतदेह देण्यास नकार दिला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता मृतदेह ताब्यात देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. बिल किती झालं? रात्री बिल भरायला तयार असूनही सकाळीच यावर पुढील कार्यवाही होईल असं सांगत ८ तास मृतदेह अडवून ठेवण्यात आला. मृताच्या नातेवाईकांनी असे आरोप केले आहेत. महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षात तक्रार दिली असून आरोग्य प्रमुखांकडेही लेखी तक्रार करण्यात आलीय.