नागपूर : टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या संचालक पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या संचालक मंडळातून अध्यक्षपदी प्रदीपकुमार मैत्र यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सरचिटणीसपदी शिरीष बोरकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी प्रभाकर दुपारे तर कोषाध्यक्षपदी ब्रह्माशंकर त्रिपाठी सहसचिवपदी विवेक पुराडभट यांची निवड करण्यात आली.
संचालक मंडळात सदस्यपदी विनोद देशमुख, जोसेफ राव, विश्वास इंदूरकर, संजीब गांगुली, महेश उपदेव, भूपेंद्र गणवीर, महेंद्र आकांत यांची निवड करण्यात आली असून नामनियुक्त सदस्य म्हणून धर्मेंद्र जोरे यांची निवड करण्यात आली. या कार्यकारणीचा कार्यकाळ सहा वर्षाचा राहील.