पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते १९ जून दरम्यान सायप्रस, कॅनडा, क्रोएशियाला भेट देणार

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते १९ जून दरम्यान सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाचा दौरा करणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसारपंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते १६ जून रोजी सायप्रसला भेट देतील. त्यानंतर १६-१७ जून रोजी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला रवाना होती. त्यानंतर ते १८ जून रोजी क्रोएशियामध्ये पाच दिवसांच्या दौऱ्याचा समारोप करतील. “सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्या निमंत्रणावरूनपंतप्रधान मोदी १५-१६ जून रोजी सायप्रसला अधिकृत भेट देतील. दोन दशकांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच सायप्रस दौरा असेल.

निकोसियामध्ये असतानापंतप्रधान मोदी क्रिस्टोडौलिड्स यांच्याशी चर्चा करतील आणि लिमासोलमध्ये व्यावसायिक नेत्यांना संबोधित करतील,” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात १६-१७ जून रोजी कॅनडातील कनानास्किस येथे जी-७ शिखर परिषदेत सहभागी होतील. जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा हा सलग सहावा सहभाग असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या शिखर परिषदेतपंतप्रधान मोदी जी-७ देशांचे नेते, इतर आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, विशेषतः एआय-ऊर्जा संबंध आणि क्वांटम-संबंधित मुद्द्यांसह महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech