नांदेड : पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री भगवंत मान हे दिल्ली येथून दुपारी १.३० वाजता विमानाने प्रयाण करून दुपारी ३.०५ वाजता नांदेड येथील गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन करतील. त्यानंतर ते नांदेड येथील विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून त्यांचा नांदेड येथे मुक्काम राहील. शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री भगवंत मान हे नांदेड येथून गुरु गोविंद सिंगजी विमानतळाकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता नांदेड विमानतळ येथून विमानाने पाटणाकडे प्रयाण करतील.