आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे ठाण्यात रुद्रपुजेचे आयोजन

0

ठाणे : होलिकोत्सवाच्या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे रविवार, १ मार्च २०२६ रोजी रुद्रपूजा आयोजित करण्यात आल्याची माहिती या पूजेचे आयोजक हेमंत बालचंदानी यांनी दिली. होळीच्या दिवशी यंदा होणारे चंद्रग्रहण मानवी जीवनासाठी फायदेशीर नाही. याचे नकारात्मक वेध २३ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत. या ग्रहाणापासून मनुष्याच्या जीवनावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांची तीव्रता कमी होण्यासाठी ही रुद्रपूजा असरदार ठरणार आहे. यावेळी रुद्र पठण, स्फटिकाच्या शिवलिंगावर अभिषेक, किर्तन आदी कार्यक्रम होणार आहे. देवराम लक्ष्मण भोईर वरिष्ठ महाविद्यालयात सकाळी ११ ते१ वाजेपर्यंत होणारा हा धार्मिक कार्यक्रम नागरिकांना मोफत असणार आहे. जीवनातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या रुद्र पूजेत सहभागी व्हावे असे आवाहन हेमंत बालचंदानी यांनी केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech