साधू आले आणि गेले पण पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये – सयाजी शिंदे

0

नाशिक : तपोवनातील झाड तोडणे म्हणजे नाशिकचे मोठे नुकसान होण्यासारखी घटना आहे त्यामुळे एकही झाड तोडू दिलं जाणार नाही अशी भूमिका अभिनेता सयाजी शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पर्यावरण प्रेमींचा सुरू असलेल्या संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक मध्ये येत्या २६-२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आणि नुकताच प्रयागराज येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळाचा अनुभव लक्षात घेता नासिक मध्ये होत असलेल्या पूर्ण कुंभमेळ्यासाठी म्हणून ५ पट गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्या पार्श्वभूमी वरती कुंभमेळा प्राधिकरण महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरू आहे त्या नियोजनाचा एक भाग म्हणून कुंभमेळ्यासाठी साधू ग्राम या ठिकाणी उभारणी केली जाणार आहे पण त्यासाठी आता प्रशासनाने या ठिकाणी असलेले १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातून मागील आठवडाभरापासून पर्यावरण प्रेमींचे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत या आंदोलनामध्ये आता सिने अभिनेता सयाजी शिंदे हे देखील सहभागी झाले आहेत. अभिनेता सयाजी शिंदे यांनी शनिवारी सकाळी तपोवन परिसरात दौरा केला यावेळी पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर पत्रकारांशी बोलताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले की, शहरामध्ये तपोवन या ठिकाणी होत असलेल्या संयुक्त कुंभमेळा हा परंपरेनुसार होत आहे यापूर्वी देखील या ठिकाणी झाडं होती मग आत्ताच असं का झालं की ही झाड तोडावी लागणार आहे. प्रशासनाने घेतलेली भूमिका ही चुकीची आहे चुकीच्या माहिती वरती प्रशासन काम करत असल्याचे सांगून सयाजी शिंदे म्हणाले की जर या ठिकाणची झाडे तोडली गेली तर नाशिक चं मोठं नुकसान होणार आहे कधीही हे नुकसान भरून निघणार नाही त्यामुळे हे वृक्षतोड करण्यास आमचा विरोध आहे. पण सिंहस्थ कुंभमेळा आमचा विरोध नाही ज्या चुकीच्या पद्धतीप्रमाणे काम चालू आहे त्याला आमचा विरोध आहे अनेक साधू म्हणता आले गेले पण तपोवन वृक्ष कायम राहिली आणि या ठिकाणी एकही झाड तोडू दिले जाणार नाही. झाड हेच सेलिब्रिटी आहे त्यामुळे त्याच्यात जतन करणं हे आमचं कर्तव्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगुन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या वरती देखील त्यांनी टीका केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech