सातारा ड्रग्ज प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी फेटाळले उपमुख्यमंत्री शिंदेंवरील आरोप

0

विरोधकांचे केवळ राजकीय स्वार्थापोटी आरोप

मुंबई : सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणारे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत. प्रस्तुत प्रकरणात आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाचा दुरान्वयेही कोणताही संबंध आढळला नाही. त्यामुळे त्यांच्यावर होणारे आरोप चुकीचे व निषेधार्ह आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला, सर्वप्रथम मी पोलिस विभागाचे अभिनंदन करतो. त्यांनी त्या ठिकाणी सुरू असलेल्या धंद्याचा पर्दाफाश केला. त्यांच्यावर मोठी कारवाई केली.

या संपूर्ण प्रकरणात जाणिवपूर्वक राजकीयदृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो चुकीचा आणि निषेधार्ह आहे. या प्रकरणात आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये सकृतदर्शनी त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील दुरान्वयेही कोणाचाही संबंध आलेला नाही. विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी सातारा अंमली पदार्थ प्रकरणात शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे मला असे वाटते की, कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीने संबंध जोडणे योग्य नाही. या संदर्भात सरकार पूर्ण चौकशी करत आहे. दरम्यान मुंबई महापालिकेतील शिवसेना – भाजपा युतीचे जागावाटप योग्यपणे सुरू आहे. महायुतीचे जागावाटप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आमचे दोन्हीकडील नेते नीट महायुतीचे जागावाटप करत आहेत. हे जागावाटप दोन दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech