सिक्कीमला गेलेल्या बेपत्ता जोडप्याचा १३ दिवसांपासून शोध सुरु

0

गंगाटोक : हनीमूनसाठी सिक्कीमला गेलेल्या उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका कपलची कार सुमारे एक हजार फूट खोल दरीत कोसळली. गेल्या १३ दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे, परंतु या कपलचा कोणताही पत्ता लागलेला नाही.त्यामुळे स्थानिक पोलीस तसेच बचाव पथक अनेक दिवसांपासून त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांना तसेच बचाव पथकाला अजूनही यश मिळालेले नाही.

कौशल्येंद्र प्रताप सिंह (२९) आणि अंकिता (२६) असे बेपत्ता झालेल्या जोडप्याचे नाव आहे. या दोघांचे लग्न ५ मे रोजी झाले होते. तर २४ मे रोजी दोघेही हनिमूनसाठी सिक्कीमकडे निघाले. सिक्कीम फिरत असताना २९ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि गाडी सुमारे १००० फूट खोल दरीत कोसळली.ही घटना सिक्कीममधील लाचेनहून लाचुंगला परतत असताना घडली.

या घटनेची माहिती मिळताच सिक्कीम पोलीस आणि लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी पोहचले आणि शोधमोहीम सुरु केली.या थरारक अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी सापडले पण सर्वात धक्कादायक म्हणजे, या अपघातात आठ पर्यटक बेपत्ता झाले. या बेपत्ता लोकांमध्ये प्रतापगडचे नवविवाहित जोडपे कौशल्येंद्र आणि अंकिता यांचाही समावेश आहे.

कौशलेंद्र याचे वडील शेर बहादूर, अंकिताचा भाऊ आणि काका यांच्यासह कुटुंबातील सात सदस्य सिक्कीमला पोहोचले होते. त्यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून मुलगा आणि सुनेचा शोध घेण्याचे आवाहन केलं. कुटुंबाने सिक्कीम आणि राज्य सरकारकडे या कपलचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech