शिवसेना उपनेत्या विजयाताई पोटे यांची प्रचारात आघाडी

0

(धनश्री पाठारी)

कल्याण :  शिवसेना उपनेत्या विजयाताई पोटे ह्या प्रभाग क्र. ७ अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १९९५ ते आतापर्यंत अखंड जनतेची सेवा करत २०००- ०५ आणि २००५-१० या कार्यकाळात २ वेळा नगरसेविका राहून, स्थायी समिती सदस्य व प्रभाग समिती अध्यक्ष अश्या अनेक पदांच्या माध्यमातून जनतेची सेवा विजया ताई पोटे यांनी केली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या विविध परिसरांत डोअर टू डोअर प्रचार करण्यात येत आहे. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभत आहे. तसेच विकासाच्या बाबतीत काळा तलाव परिसरात जी १९५०-५५ पासूनची चाळीतील घरे आहेत त्यांना क्लस्टर च्या माध्यमातून सोसायटी मधे घरे देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे विजयाताई पोटे यांनी सांगितले आहे. तसेच माझ्या माध्यमातून या आधी सीमेंट रस्ते, काँक्रिटीकरण करण्यात आले असल्याचे देखील विजया ताई यांनी सांगितले आहे.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech