सोनाटाचे ‘वॉच आऊट फॉर अस’, कहाणी ध्येयाच्या ध्यासाची, महत्त्वाकांक्षांच्या प्रवासाची

0

सोनाटाची नवी ब्रँड फिल्म – तरुणांची जिद्द, वेगवान प्रगती आणि अफाट आत्मविश्वासाला हुबेहूब टिपते

नागपूर : माणूस कुठून आला ते महत्त्वाचे नसते तर पुढे किती मोठी झेप घेण्याची जिद्द त्याच्यामध्ये आहे यावर त्याचा मोठेपणा ठरतो. सोनाटाचे नवे ब्रँड फिल्म कॅम्पेन ‘वॉच आउट फॉर अस’ उद्दिष्ट, वेग आणि आत्मविश्वासाने प्रेरित असलेल्या आजच्या पिढीचा गौरव करते. कोणतेही संकट आले तरी त्यावर मात करून जिद्दीने पुढे जाण्याची ओढ या पिढीमध्ये आहे. त्यांच्यासाठी ‘स्टाईल’ म्हणजे फक्त फॅशन नव्हे तर त्यांच्या प्रगतीची ओळख आहे. किंबहुना त्यांची स्टाईल हीच त्यांची ओळख आहे. अत्यंत मेहनतीने स्वतःचे भविष्य स्वतः घडवू पाहणाऱ्या तरुणांच्या सन्मानार्थ सोनाटाने ही फिल्म तयार केली आहे.

‘वॉच आउट फॉर अस’ हे कॅम्पेन म्हणजे एक ब्रँड म्हणून ‘सोनाटा’च्या एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे, एक असा ब्रँड जो तरुण भारताच्या प्रगतीशी घट्ट जोडलेला आहे. हे कॅम्पेन अशा मानसिकतेचे दर्शन घडवतो जी कोणाच्याही परवानगीसाठी किंवा मान्यतेसाठी थांबून राहत नाही. ही पिढी स्वतःच्या अटींवर जगते, जिद्दीने पुढे जाते आणि प्रगतीचे मोजमाप इतरांच्या कौतुकावरून नव्हे, तर स्वतः गाठलेल्या टप्प्यांवरून करते. ही मानसिकता सोनाटाला समजते म्हणूनच या प्रवासात, महत्त्वाचे निर्णय असोत वा प्रगतीचे क्षण, सोनाटाचे घड्याळ कायम त्यांच्या सोबत राहते.

कष्ट, जिद्दीच्या बळावर स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तीन तरुणांची ही ऊर्जेने ओतप्रेत भरलेली कथा! रॅपच्या ठेक्यावर मांडलेली ही फिल्म आजच्या ‘यंग इंडिया’च्या धडधडत्या हृदयाचे प्रतिबिंब आहे.

टायटन कंपनीच्या ॲनालॉग वॉचेस विभागाच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर श्रीमती रंजनी कृष्णस्वामी म्हणाल्या: “गेल्या वर्षभरात सोनाटाने नव्या पिढीच्या ग्राहकांच्या मानसिकतेशी जुळवून घेण्यासाठी ब्रँडमध्ये जाणीवपूर्वक बदल केले आहेत. ही नवी पिढी महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वासू आहे आणि यशाची व्याख्या स्वतःच्या अटींवर करत आहे. एक ‘व्हॅल्यू-लेड फॅशन वॉच ब्रँड’ म्हणून आमची धोरणे सुसंगतता, सुलभता आणि आकांक्षा यावर आधारित आहेत. आमचे लक्ष असा ब्रँड घडवण्यावर आहे जो प्रगतीशील तरुणांचे विचार आणि त्यांच्या बदलत्या जीवनशैलीचे प्रतिबिंब असेल, इतकेच नव्हे तर त्यांच्या प्रवासात त्यांना सक्षम देखील करेल. भारताच्या वाढत्या ग्राहक वर्गासाठी सोनाटा हा एक विश्वासार्ह आणि आधुनिक पर्याय अशी ओळख आम्ही निर्माण करत आहोत.”

फिल्म पाहण्यासाठी लिंक – https://youtu.be/Ktf-Wm-3ycQ

या कॅम्पेनमधून, सोनाटा हा ब्रँड प्रगतीच्या वाटेवर धावणाऱ्या आजच्या पिढीसाठी, यशाची नवी ओळख बनला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech