डॉ. रचना कुलकर्णी आणि डॉ. आनंद कुलकर्णी यांच्या साह्याने अक्षय पात्र मिशनच्या नागपूर अन्न वितरण उपक्रमाला साह्य

0

नागपूर : अक्षय पात्र फाऊंडेशनतर्फे आज त्यांच्या नागपूर केंद्रात अन्न वितरणासाठी इलेक्ट्रिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या फाऊंडेशनच्या उपक्रमाला सातत्याने हातभार लावणारे आणि दीर्घकाळ पाठिंबा देणारे डॉ. रचना कुलकर्णी आणि डॉ. आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या भरघोस देणगीमुळे हे शक्य झाले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण भागीदारीतून मुलांच्या पोषणाला बळकटी देण्याची सहकार्यात्मक बांधिलकी दिसून येते. शिवाय, यामुळे मोठ्या प्रमाणावरील अन्न वितरण प्रणालीत पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

नव्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यामुळे फाऊंडेशनच्या दैनंदिन अन्न वितरण उपक्रमाला साह्य लाभणार आहे. ताजे बनवलेले, पोषक अन्न विविध भागांमधील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो मुलांपर्यंत सुयोग्य वेळेत पोहोचवणे त्यामुळे शक्य होणार आहे. यातील प्रत्येक वाहनामुळे दररोज सुमारे २००० मुलांचा फायदा होणार आहे. यामुळे अक्षय पात्रच्या लॉजिस्टिक प्रणालीची पोहोच आणि विश्वासार्हता यातही वाढ होईल.

अन्नवितरण प्रणालीला बळकटी देतानाच शून्य उत्सर्जन इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे अक्षय पात्र शाश्वतता आणि जबाबदार कार्यचलनावर भर देत असल्याचेही अधोरेखित झाले आहे. आपल्या ताफ्यात स्वच्छ इंधन पर्याय वापरून या फाऊंडेशनने आपल्या डिलिव्हरी सेवेला पर्यावरणपूरक पद्धतींची जोड दिली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावरील कार्यपद्धतीत अधिक चांगले परिणाम घडून येतील.

या प्रसंगी अक्षय पात्र फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीधर वेंकट म्हणाले, “डॉ. रचना कुलकर्णी आणि डॉ. आनंद कुलकर्णी सातत्याने अक्षय पात्रला करित असलेल्या साह्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यांच्या दयाळूपणामुळे मुलांना पोषक अन्न देण्याच्या आमच्या क्षमतेला बळकटी मिळतेच. शिवाय, आमच्या कार्यपद्धतीतील शाश्वत पर्यायांचे महत्त्वही अधोरेखित होते. ही इलेक्ट्रिकल वाहने फक्त अन्नपदार्थ वाहून नेणार नाहीत… ते आपल्यासोबत पोषणाची खात्री घेऊन जातील, आत्मविश्वाने शिक्षण घेण्याच्या संधी ते मुलांपर्यंत घेऊन जातील. ”

नागपूर केंद्रातील या कार्यक्रमाला अक्षय पात्र फाऊंडेशनचे प्रतिनिधी, हितचिंतक उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना गरम, पोषक अन्न सातत्याने आणि परिणामकारकरित्या उपलब्ध करून देणारी फाऊंडेशनची सुविधा अधिक बळकट करण्याच्या दिशेने यावेळी आणखी एक पाऊल टाकले गेले आहे.

अक्षय पात्र फाऊंडेशनतर्फे मागील २५ हून अधिक वर्षे भारत सरकारच्या पीएम पोषण उपक्रमाची अमलबजावणी केली जात आहे. याद्वारे सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे पोषक जेवण पुरवले जाते. आजघडीला, या फाऊंडेशनतर्फे १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये दररोज 23.5 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते. २०३० पर्यंत हा आकडा 30 लाखांवर नेण्याचा फाऊंडेशनचा मानस आहे. देशभरातील या प्रणालीमध्ये नागपूर केंद्र महत्त्वाचे आहे. यातून या भागातील हजारो मुलांना दररोज पोषण आणि शिक्षण दिले जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech