दहशतवादाला झिरो टॉलरन्स असले पाहिजे – एस जयशंकर

0

ब्रुसेल्स/ नवी दिल्ली : ओसामा बिन लादेन नावाचा दहशतवादी पाकिस्तानात सुरक्षित होता. जगाने हे समजून घ्यावे की, हा केवळ भारत-पाकिस्तानचा मुद्दा नाही. आम्हाला ठामपणे वाटते की, दहशतवादाला झिरो टॉलरन्स असले पाहिजे. याबाबत आपण कधीही आण्विक ब्लॅकमेलिंगला बळी पडू नये. हे जगासमोरील एक मोठे आव्हान आहे. या विषयावर मजबूत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समज असणे अत्यावश्यक आहे. हा दहशतवादाचा मुद्दा आहे, शेवटी याचा तुम्हालाही त्रास होईल, असे ठाम मत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मांडले.

ब्रुसेल्स दौऱ्यात जयशंकर यांनी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि ईयूच्या परराष्ट्र व्यवहार प्रमुख काजा कल्लास यांची भेट घेतली. या दरम्यान, त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यात एकता दाखवल्याबद्दल उर्सुला वॉन डेर लेयन यांची प्रशंसा केली. तसेच, भारताचे धोरणात्मक महत्त्व, जागतिक स्थिती अधोरेखित करण्यासोबतच युरोपियन युनियनच्या प्रमुख धोरणांवर आक्षेप व्यक्त केला.

युरोपीय युनियन आणि भारत मुक्त व्यापार करारावर सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत बोलताना जयशंकर यांनी भारताला एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हटले. १.४ अब्ज लोकसंख्या असलेला भारत चीनपेक्षा कुशल कामगार आणि अधिक विश्वासार्ह आर्थिक भागीदारी देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली

.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech