पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच ; पाकिस्तानी मतदार कार्ड सापडले

0

नवी दिल्ली : जुलै रोजी ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी स्थानिक नव्हते तर पाकिस्तानी होते. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत, जी स्पष्ट करतात की हे दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांकडून आणि चकमकीच्या ठिकाणाहून मिळालेल्या पुराव्यांवरून ते पाकिस्तानचे असल्याचे स्पष्ट झाले.

यामध्ये दहशतवाद्यांचे मतदार ओळखपत्र आणि बायोमेट्रिक रेकॉर्ड (बोटांचे ठसे, चेहऱ्याची ओळख, कुटुंबाची माहिती) पाकिस्तानच्या राष्ट्रीय डेटाबेसशी जुळली आहे. यामध्ये सॅटेलाइट फोन आणि जीपीएस डेटा, पाकिस्तानमध्ये बनवलेले चॉकलेट रॅपर्स जे (मे २०२४ मध्ये मुझफ्फराबाद (पीओके) येथे पाठवले गेले) पहलगाम हल्ल्यादरम्यान चाललेल्या गोळ्यांचे खोके (चकमकीनंतर सापडलेल्या रायफल्सशी जुळणारे), रक्ताने माखलेल्या शर्टमधून डीएनए (त्या तीन दहशतवाद्यांच्या डीएनएशी जुळतो) यांचा समाविष्ट आहे.

अधिकाऱ्याने सांगितले, हे पुरावे दहशतवाद्यांचे पाकिस्तानी नागरिकत्व सिद्ध करतात. पाकिस्तान सातत्याने हे सांगत होता की या हल्ल्यात त्याचा काहीही संबंध नाही. मात्र, या पुराव्यांच्या आधारे भारत आता संयुक्त राष्ट्रांसह इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानला कठोरपणे उघड करू शकेल. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची खरी नावे सुलेमान शाह, अबू हमजा, आणि यासिर आहेत. या बाबत गृह मंत्रालयाच्या नोटमध्ये खुलासा करण्यात आला आहे.

२८ जुलै २०२५ रोजी भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत या दहशतवाद्यांना ठार केले होते. ऑपरेशन महादेव दरम्यान गोळा करण्यात आलेल्या फॉरेन्सिक, दस्तऐवज आणि साक्षीदारांच्या निवेदनांवरून हे स्पष्ट झाले की हे तिघेही पाकिस्तानी नागरिक आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे वरिष्ठ कमांडर होते. ते हल्ल्याच्या दिवशीपासून दाचीगाम-हरवानच्या जंगलात लपून बसले होते. या हल्ल्यात कोणताही स्थानिक काश्मिरी सहभागी नव्हता, हे देखील निष्पन्न झाले आहे. दहशतवाद्यांकडून अमेरिकन एम४ कार्बाइन, एके-४७, १७ रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.

चकमकीच्या दुसऱ्या दिवशी, २९ जुलै रोजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती लोकसभेत दिली होती. त्यांनी म्हटले होते की पहलगामच्या बैसरन खोऱ्यात आमच्या २६ पर्यटकांना मारणारे दहशतवाद्यांना २८ जुलै रोजी ऑपरेशन महादेवमध्ये मारण्यात आले. अमित शहा म्हणाले, ‘या दहशतवाद्यांची नावे सुलेमान, अफगाण आणि जिब्रान आहेत. हे तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी होते. सुरक्षा दलांनी पाकिस्तानी मतदार ओळखपत्र-चॉकलेटवरून पहलगामच्या दहशतवाद्यांना ओळखले.’

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech