ठाणे : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने एफटीएल एकादश संघाचा तीन गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित उपमुख्यमंत्री चषक १३ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा बाजी मारली. एफटीएल एकादश संघाचे १४४ धावांचे आव्हान सात बळी राखून १४८ धावांसह पार करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तीन बळी मिळवणारा अमित पांडे आणि ४४ धावांचे योगदान देणारा ऋग्वेद मोरे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या विजयाचे शल्पकार ठरले.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय एफटीएल एकादश संघासाठी फायदेशीर ठरला नाही. साईराज पाटील आणि शोएब शेखचा अपवाद वगळता एफटीएल एकादशच्या इतर फलंदाजाना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या गोलंदाजांनी चांगलेच जखडून ठेवले.एफटीएल एकादश संघाच्या साईराज पाटीलने ४६ आणि शोएब शेखने ३१ धावा बनवल्या. हार्दिक तामोरेला या निर्णायक लढतीत १९ आणि अमित मिश्राला १९ धावा करता आल्या. अमित पांडेने तीन, कर्ष कोठारी, तनुष कोटियन आणि प्रशांत सोळंकीने प्रत्येकी दोन बळी मिळवले. उत्तरादाखल ऋग्वेद मोरे, अमन खान, अर्जुन शेट्टी आणि सुवेद पारकरने छोटया पण महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजयाच्या वाटेवर नेले.
ऋग्वेदने ४४, अमनने २५,अर्जुनने २२, अमितने नाबाद १६ आणि सुवेदने १६ धावांचे योगदान दिले. प्रतिस्पर्ध्याकडून सर्वात यशस्वी ठरलेल्या अजय मिश्राने तीन फलंदाज बाद केले. साईराज पाटील आणि विक्रम पांडेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
संक्षिप्त धावफलक : एफटीएल एकादश : १९.२ शतकात सर्वबाद १४४( साईराज पाटील ४६, शोएब शेख ३१, हार्दिक तामोरे १९, अजय मिश्रा १८, अमित पांडे३.२-३१-३, कर्ष कोठारी ४-३७-२, तनुष कोटियन ४-१७-२, प्रशांत सोळंकी ३-२७-२ ) पराभूत विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब ) : १७.५ षटकात ७ बाद १४८( ऋग्वेद मोरे ४४, अमन खान २५, अर्जुन शेट्टी २२, अमित पांडे नाबाद १६, सुवेद पारकर १६, अजय मिश्रा ४-२८-३, साईराज पाटील ३.५.- ४०-१. विक्रम पांडे ४-२३-१). सामनावीर : अमित पांडे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : फलंदाज – चिन्मय सुतार, गोलंदाज – प्रशांत सोळंकी. मालिकावीर – साईराज पाटील, सर्वात जास्त षटकार – साईराज पाटील.