काशी : काशी येथील पवित्र काशी विश्वनाथ येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. गंगा नदीच्या तीरावर पारंपरिक धार्मिक विधी व मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला.
सदर अस्थी विसर्जन प्रमोद हिंदुराव आणि राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक तसेच निकटवर्तीय उपस्थित होते. संपूर्ण वातावरण श्रद्धा आणि भावनिकतेने भारलेले होते.
स्वर्गीय अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या समाजोपयोगी कार्याची उपस्थितांनी आठवण काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.