डॉक्टर तरुणीने दबावाबाबत वेळीच सांगायला हवे होते – अतिरिक्त पोलीस अधीक्षक 

0

(मंगेश तरोळे-पाटील) 

मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीची आत्महत्या ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. संबंधित महिला डॉक्टरने याबाबत वेळीच कुणाला सांगितले असते तर त्यांचे प्राण आज वाचले असते. या घटनेचा प्रशासकीय बाबींशी अर्थाअर्थी संबंध नसल्याचे साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ही घटना अतिशय दुर्दैवी असून ह्या घटनेचा तपास करतांना कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी वेळीच कुणाला सांगितले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, असे यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी स्पष्ट केले.

डाक्टर तरुणीची आत्महत्याप्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. त्या मागील दोन दिवसांपासून फलटण येथे ठाण मांडून आहेत. नियमित तपासकामाचा सूचना देऊन आढावा घेत आहेत. याविषयी माहिती देण्यासाठी त्या माध्यमांशी बोलत होत्या. ही २९ वर्षीय डॉक्टर साताऱ्याच्य फलटणमधील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत  असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकर म्हणाल्या की, गुरुवारी रात्री फलटण शहरातील एका हॉटेलमधील खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. मृत डॉक्टरने आपल्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिले असून, त्यात दोघांचा उल्लेख केलेला होता. यापैकी एक फलटणमधील पोलीस उपनिरीक्षक असून, दुसरा व्यक्ती त्या डॉक्टर भाड्याने राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech