जाहीरनामा मुंबईचा चेहरामोहरा बदलणारा संकल्प – एकनाथ शिंदे

0

मुंबई हा या देशाचा प्राण, ग्रोथ इंजिन

मुंबई : मुंबई हा या देशाचा प्राण आहे. ग्रोथ इंजिन आहे. या मुंबईला पुढच्या पाच वर्षांत जागतिक दर्जाचे शहर करण्याचे वचन आम्ही देत आहोत. हा केवळ जाहीरनामा नसून मुंबईचा चेहरामोहरा बदलणारा संकल्प आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, १५ तारखेला मुंबई महापालिका निवडणुक पार पडत आहे. आजचा हा वचननामा मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो. केंद्रात आणि राज्यात महायुतीचेच सरकार आहे. आता १६ तारखेला महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकेल. मुंबईच्या विकासासाठी जे करायचं आहे ते आम्ही या वचननाम्यात सांगितले आहे. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे एक वर्ष, आम्ही मुंबईत जे काम केले, ते आपल्यासमोर आहेच. मुंबईच्या विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. ते आम्ही यात दिलेच आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमची जबाबदारी आहे. वचन आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आम्हला पुन्हा एकदा मुंबईत आणायचा आहे. मुंबईकर इकडे वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत गेलाय, तर दुसरीकडे अंबरनाथ बदलापूर वांगणीपर्यंत गेला, याला जबाबदार कोण? असा प्रश्न करत, याचा विचार व्हायला हवा, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेनाप्रमुखांचे लक्ष होते. आता आम्ही या संपूर्ण प्रकल्प मार्गी लावायचा निर्णय घेतला आहे. हक्काची घरं मुंबईकरांना मिळायला हवीत, यासंदर्भातही वचन आम्ही दिले आहे. सर्वांसाठी घरे ही संकल्पना पुढे नेण्यासाठी ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना घरे मिळतील आणि मुंबई बाहेर गेलेला माणून पुन्हा मुंबईत येईल. पंतप्रधान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि माझ्यावर सातत्याने टीका करत आहेत की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार परंतु असं कदापी होणार नाही. पंतप्रधान मोदींनी मुंबईला फार महत्व दिले आहे. मुंबई फिनटेक सिटी करण्याचा पंतप्रधानांचा निर्धार आहे. यामुळे येणाऱ्या ५ वर्षांत मुंबईला फिनटेक सिटी करायला हवे, अशी आमची भावना आहे. त्यासाठी केंद्र-राज्य सरकार आणि मनपा मिळून हे करेल.

लाखो तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष देखील आम्ही महापालिकेचेच्या माध्यमातून विविध सामाजिक लोकाभीमुख उपक्रम राबवणार आहोत. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ करण्याचाही आमचा मानस आहे. मुंबईकर लाडक्या बहिणीसाठी बेस्टमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. लघू उद्योजकांना ५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणे, पुनर्विकासासाठी कोणतेही अडथळे येणार नाहीत, याची व्यवस्था आम्ही केली आहे. याशिवाय पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देऊ, वचननाम्यातील अशा अनेक गोष्टी एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech