राष्ट्रपतीसह पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

0

नवी दिल्ली : देशभरात नववर्ष २०२६चे स्वागत उत्साह आणि आशेच्या वातावरणात केले जात आहे. लोक एकमेकांना शुभेच्छा देत नव्या वर्षाचे स्वागत करत आहेत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी सुखसमृद्धी, लोकशाही, सामाजिक न्याय आणि प्रगतीचा संदेश दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नववर्षाच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा देताना म्हटले की, नवे वर्ष सकारात्मक बदलांसह आत्मचिंतन आणि नव्या संकल्पांची संधी घेऊन येते. त्यांनी पर्यावरण संरक्षणाबाबतची आपली बांधिलकी अधिक बळकट करण्याचे आवाहनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नववर्ष २०२६च्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे वर्ष सर्वांसाठी उत्तम आरोग्य, समृद्धी आणि यश घेऊन येवो, अशी त्यांनी कामना केली. कामांमध्ये यश आणि जीवनात समाधान लाभो, तसेच समाजात शांती आणि आनंद नांदो, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech