जम्मू-काश्मीरवर पसरली अवकळा

0

श्रीनगर : जम्मा-काश्मीरच्या पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग झाल्यानंतर बहुतांश पर्यटकांनी काश्मिरातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे ओस पडलेल्या बाजारपेठा, रिकामे हॉटेल्स आणि पर्टन स्थळांमध्ये स्मशानशांतता असे चित्र पहायला मिळते आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील हिंदू पर्यटकांच्या टार्गेट किलींगनंतर राज्यात तणाव पसरला आहे. या हल्ल्यानंतर सर्व पर्यटकांनी हॉटेल्स सोडली आहेत. त्यामुळे हॉटेल्स ओस पडली आहेत. परिणामी, कोरोनानंतर हॉटेल क्षेत्रात मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. पर्यटकांना मारल्याने लोक इकडे यायला घाबरत आहेत. त्याचप्रमाणे आगामी मे आणि जून महिन्यात देखील पर्यटक राज्यात फिरकण्याची शक्यता नाही. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूट, केशरचा व्यवसाय चालतो.पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांनी पाठ फिरवल्याने बाजारपेठा अक्षरशः ओस पडल्या आहेत. मालाला ग्राहक नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत. याचा फटका व्यापाऱ्यांसह उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे.

पर्यटकांना विविध ठिकाणी नेण्याचे काम कारचालक आणि घोडेस्वार करतात. पर्यटक आले नाहीत तर घोड्यांचे चारा-पाणी कसे करायचे, असा प्रश्न या लोकांना सतावत आहे. पर्यटनामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात हॉटेलात आणि ड्रायव्हर म्हणून काम मिळते. अनेकांनी बँकांचे कर्ज घेऊन स्वतःच्या गाड्या घेतल्या आहेत. आता पर्यटक फिरकले नाहीत तर बँकेचे कर्ज कसे भरायचे,असा यक्षप्रश्न युवकांपुढे उभा ठाकला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech