नाशिक : कोणत्याही गुंतवणूकदारासाठी, वास्तववादी आर्थिक ध्येय निश्चित करणे ही यशस्वी गुंतवणुकीच्या दिशेने टाकलेली पहिली पायरी असते. सातत्याने चांगला परतावा देणारा गुंतवणुकीचा पर्याय शोधणे महत्त्वाचे असले, तरी दीर्घकाळासाठी सर्वोत्तम परिणाम साध्य करण्याच्या दृष्टीने, त्या गुंतवणुकीशी निगडित जोखीम समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विविध ‘ॲसेट क्लास’मधील (मालमत्ता वर्गांमधील) उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीतून निवड करून, छोट्या काळासाठी ते दीर्घकालीन अशा विविध आर्थिक ध्येयांची पूर्तता करण्यासाठी ‘म्युच्युअल फंड’ पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे ध्येय साध्य करण्यासाठी गुंतवणूकदारांना ज्यामध्ये गुंतवणूक करता येईल, अशा एका विशिष्ट म्युच्युअल फंड उत्पादनाच्या श्रेणीची माहिती येथे दिली आहे.
फ्लेक्सी-कॅप फंड्स हे ओपन-एन्डेड इक्विटी फंड्स असतात, जे आपल्या एकूण मालमत्तेपैकी किमान ६५% हिस्सा विविध बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांच्या इक्विटी मालमत्तेमध्ये गुंतवतात; यामध्ये लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांचा समावेश असतो. यूटीआय फ्लेक्सि कॅप फंड हा या श्रेणीतील सर्वात जुन्या फंड्सपैकी एक आहे (याची सुरुवात १९९२ मध्ये झाली होती) आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा याला दीर्घकालीन इतिहास आहे. या फंडाची एकूण मालमत्ता २२,८०० कोटी रुपयांहून अधिक आहे (दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या स्थितीनुसार). यूटीआय म्युच्युअल फंडची ही योजना अशा कोणत्याही गुंतवणूकदारासाठी अत्यंत उपयुक्त आहे, जो फंड गुंतवणूकदारांसाठी आर्थिक मूल्य निर्माण करण्याची क्षमता असलेल्या, दर्जेदार व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो.
यूटीआय फ्लेक्सि कॅप फंडाचे गुंतवणूक तत्त्वज्ञान गुणवत्ता, वाढ आणि मूल्यांकन या तीन स्तंभांवर आधारित आहे. दीर्घकाळापर्यंत दमदार वाढ दर्शविण्याची क्षमता आणि ज्यांचे व्यवस्थापन अनुभवी असते, अशा व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याची या पोर्टफोलिओची रणनिती असेल. गुणवत्ता म्हणजे एखाद्या व्यवसायाची, दीर्घ कालावधीपर्यंत गुंतवलेल्या भांडवलावरील परतावा (RoCE) किंवा भागभांडवलावरील परतावा (RoE) उच्च पातळीवर टिकवून ठेवण्याची क्षमता होय. कठीण काळ असतानाही आपल्या संबंधित उद्योगांसाठी किंवा क्षेत्रांसाठी उच्च RoCE आणि RoE निर्माण करण्यास समर्थ असणारे व्यवसायच खऱ्या अर्थाने उच्च दर्जाचे व्यवसाय असतात; म्हणूनच, ते नेहमीच त्यांच्या भांडवलाच्या खर्चापेक्षा अधिक कार्यक्षमतेने कार्यरत असतात. बहुतांश वेळा, ज्या व्यवसायाचा RoCE/RoE उच्च असतो, तो व्यवसाय भक्कम रोख प्रवाह (Cash-flows) निर्माण करण्यास सक्षम ठरतो; आणि हेच भक्कम रोख प्रवाह आर्थिक मूल्य निर्मितीचे मुख्य स्रोत बनतात.
दुसरीकडे, ‘वाढ’ म्हणजे व्यवसायाची दीर्घकालीन, सातत्यपूर्ण वाढ होय. हा फंड चक्रीय आणि अस्थिर वाढीऐवजी, स्थिर आणि वाढीच्या मार्गाचा अंदाज असलेल्या व्यवसायांवर भर देतो. चक्रीय वाढ किंवा घट खूप तीव्र आणि अनपेक्षित असू शकते तसेच ती गुंतवणूकदारांना दोन्ही अनुभव देऊ शकते. याउलट, सातत्यपूर्ण वाढीमध्ये दीर्घकालीन प्रेरक घटक आणि त्यामुळे भविष्यातील परिणाम समजून घेण्यात तुलनेने अधिक निश्चितता असते. उच्च दर्जाचे व्यवसाय आर्थिक मूल्य निर्माण करतात, तर उच्च वाढीचा व्यवसाय या आर्थिक मूल्याची चक्रवाढ करण्यास सक्षम करतो. याच कारणामुळे, गुणवत्ता आणि वाढ यांचा संगम हे स्टॉक निवडीसाठी या फंडाचे सर्वात आवडते क्षेत्र आहे.
फंडाच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानाचा शेवटचा स्तंभ म्हणजे मूल्यांकन. एखाद्या उत्कृष्ट व्यवसायात प्रवेश करण्यासाठी ‘मूल्यांकन’ हे एक महत्त्वाचे परिमाण आहे; म्हणूनच, एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी याचा अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. ‘किंमत-ते-उत्पन्न’ गुणोत्तर, म्हणजेच P/E गुणक, हे एखाद्या व्यवसायाच्या मूल्यांकनाचे आकलन करण्यासाठी एक चांगली सुरुवात असली, तरीही मूल्यांकनाची ही पद्धत अनेकदा मोठ्या प्रमाणावर गैरसमजाचा विषय ठरते. पी/ई हे केवळ त्या कंपनीची दीर्घकाळातील रोख प्रवाह निर्माण करण्याची आणि मूल्य निर्मिती करण्याची क्षमता दर्शवणारे एक संक्षिप्त सूचक आहे. बहुतांश वेळा, उच्च RoCE (गुंतवलेल्या भांडवलावरील परतावा) आणि वेगाने वाढणारा व्यवसाय दीर्घकाळासाठी अधिक मूल्य निर्माण करतो; आणि म्हणूनच, गणिताच्या दृष्टीने पाहता, असा व्यवसाय उच्च P/E गुणोत्तरास पात्र ठरतो. जे दीर्घकालीन गुंतवणूकदार, पुढील काही महिने किंवा तिमाहींमध्ये कोणता शेअर अधिक चांगला परतावा देईल यावर लक्ष केंद्रित न करता, व्यवसायाच्या मूलभूत तत्त्वांच्या आधारे गुंतवणूक करतात, त्यांच्यासाठी अशी गुंतवणूक आजही एक आकर्षक पर्याय ठरू शकते. त्यामुळे, केवळ P/E गुणोत्तरांकडे पाहून कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी, प्रत्येक व्यवसायाची वैशिष्ट्ये काळजीपूर्वक अभ्यासणे आणि त्यानंतर त्या प्रत्येक व्यवसायासाठी मूल्यांकनाची योग्य मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. P/E गुणोत्तरातून जेवढी माहिती समोर येते, त्यापेक्षा कितीतरी अधिक माहिती दडवून ठेवतेली जाते. म्हणूनच, याचा विचार करताना नेहमीच ‘RoCE’, व्यवसायात पुन्हा गुंतवणूक करण्याच्या संधी आणि मुक्त रोख प्रवाह या संदर्भांचा आधार घेणे अनिवार्य ठरते.
हा फंड ग्रोथ या गुंतवणूक शैलीचे अनुसरण करत, बाजारातील भांडवलीकरणाच्या संपूर्ण व्याप्तीमध्ये गुंतवणूक करतो. योजनेच्या गुंतवणुकीतील शीर्ष दहा समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक लि., बजाज फायनान्स लि. एचडीएफसी बँक लि. इंटर्नल लि., टायटन कंपनी लि., कोटक महिंद्रा बँक लि., अव्हेन्यू सुपरमार्ट्स लि., इन्फो-एज (इंडिया) लि., भरती एअरटेल लि. आणि पर्सिस्टंट सिस्टीम्स लि. यांचा समावेश आहे; २८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या स्थितीनुसार, या समभागांचा वाटा फंडाच्या एकूण गुंतवणुकीच्या सुमारे ४४% इतका आहे.
यूटीआय फ्लेक्सि कॅप फंड हा अशा इक्विटी गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, जे आपला मुख्य इक्विटी पोर्टफोलिओ उभारू इच्छितात आणि आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या दर्जेदार व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल वृद्धी साध्य करण्याच्या शोधात आहेत. ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता मध्यम स्वरूपाची आहे आणि जे एखादे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान ५ ते ७ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छितात, ते या फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.