मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह परिवहन मंत्री राहणार उपस्थित
ठाणे : विदर्भ वैभव मंदिर, मुंबई आणि विदर्भ समाज संघ, मुंबई व ठाणे आयोजित मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हजारो वैदर्भिय बांधवांचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी दि. ४ मे रोजी सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संमेलनाचे अध्यक्ष स्थान भुषविणार असुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संमेलनाचे उद्घाटक आहेत. या संमेलनात परिवहन मंत्री विदर्भ भूषण ना. प्रताप सरनाईक यांचा सत्कार तसेच विदर्भ उद्योगश्री पुरस्कार श्री. योगेश पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. तरी, हजारोंच्या संख्येने वैदर्भिय बांधवांनी या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष पुरुषोत्तम भुयार यांनी केले आहे.
विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली या जिल्हयांचा समावेश होतो. नोकरी – व्यवसाया निमित्त तसेच, राजकिय व सामाजिक क्षेत्रात विदर्भातील अनेक जण मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई परिसरात वास्तव्यास आहेत. या तमाम वैदर्भिय बांधवांना एकत्र करून त्यांच्याशी हितगुज करण्याहेतु वैदर्भिय बांधवांचे वार्षिक स्नेहसंमेलन ठाण्यात आयोजित केले आहे. विदर्भ वैभव मंदिर, मुंबई आणि विदर्भ समाज संघ, मुंबई व ठाणे ह्यांनी आयोजित केलेल्या या संमेलनाला हजारो विदर्भवासियां समवेत खासदार अनिल बोंडे , खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उद्योगपती सुरेश हावरे, ठामपा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती विदर्भ वैभव मंदिराचे अध्यक्ष अशोक राव बारब्दे, सरचिटणीस गजानन नागे,विदर्भ समाज संघ मुंबई चे अध्यक्ष पुरुषोत्तम भुयार, सरचिटणीस उत्तम लोणारकर आणि संमेलनाचे निमंत्रक राजेंद्र हटवार यांनी दिली.