मुंबकारांसाठी अंत्यत महत्तवाची खूष खबर….पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी…

0

 


भातसा धरण ओव्हर फ्लो…नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

भातसा नगर (शहापूर) : प्रफुल्ल शेवाळे

शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्यातील तानसा, वैतरणा, भातसा या धरणानमधून मुंबई ला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.. सगळ्यांच धरण क्षेत्रात उत्तम रित्या पाऊस झालेला आहे. मागील काही दिवसापासून भातसा परिसरात सुद्धा सतत पाऊस होतंआहे.यामुळे धरणामध्ये पाण्याचा येवा वाढला आहे आणि याचं धर्तीवर पाण्याची पातळी समतोल राखण्या करिता धरणाचे दरवाजे उघडावे लागतात.आज सकाळी शहापूर विधानसभा आमदार दौलत आणि त्यांच्या पत्नी सौ. गीताताई दरोडा यांच्या हस्ते नारळ, साडी चोळीचा मान देत विधिवत रित्या धरणाचे जलपूजन करण्यात आले. सकाळी १०:३४ मिनिट च्या सुमारास भातसा धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मी. ने उघडण्यात आले आहेत.भातसा धरण वाहू लागल्याने मुंबईकर नक्कीच सुखावले असणार यात शंका नाही. आजची पाण्याची पातळी १३८ मी म्हणून नोंद करण्यात आली होती. भातसा धरण पूर्ण भरून वाहण्याची क्षमता ही १४२ मीटर इतकी आहे.

यावेळी आमदार दरोडा यांनी म्हटलं आहे की धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर वाहत्या पाण्याचा साठा वाढणार आहे. नदी काठच्या गावांनी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.पाऊसाचा जोर आणखीन वाढला आणि धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले तर पूर परिस्थिती निर्माण होउ शकते. अशा वेळी तात्काळ तहसील दार, पोलीस प्रशासन आणि आम्हाला संपर्क करा. आमच्या सर्वांकडून पुढील खबरदारीचा उपाय म्हणून उपाय योजना, अमलात आणल्या जातील.

भातसा धरण अभियंता रवींद्र पवार यांनी दि. २२ जुलै रोजी शहापूर, भिवंडी, कल्याण महसूल विभाग आणि संबंधित पोलीस प्रशासन ला सूचना पत्रक जारी केले आहे. भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग प्रवाहित करणे आणि नदी काठच्या गावांना सावधान तेचा इशारा संबंधित पत्रा द्वारे देण्यात आला आहे. यावेळी भातसा धरण कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश चिटणीस डी. के. विश सर, तालुका अध्यक्ष मनोहर सासे, जिल्हा सोशल मीडिया सेल अध्यक्ष प्रफुल्ल शेवाळे, युवक तालुका अध्यक्ष दिनेश चंदे,तालुका सरचिटणीस सतीश सासे, तालुका युवक उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड आणि माध्यम प्रतिनिधी, भातसा धरण जलसंपदा विभाग कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech