गरिबांच्या घराची लढाई आम्ही अखेर पर्यंत लढू – आशिष शेलार

0

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांच्या घरांचा लढा आम्ही अखेर पर्यंत लढू, अशी ग्वाही मुंबई उपनगर पालकमंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांनी आज दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील केतकी पाडा, जानू पाडा, पिंपरी पाडा या भागातील रहिवासी प्राथमिक सुविधां पासून वंचित असून आज उपनगर पालकमंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांनी पाहणी करुन रहिवाशांशी संवाद साधला. तसेच रहिवाशांनी सुरु केलेल्या स्वाक्षरी मोहीमेला शुभारंभ केला. यावेळी त्यांच्या सोबत माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे, गणेश खणकर आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, दहिसर आणि मालाड, गोरेगावपर्यंत वन विभागाच्या जागेवरील असलेल्या माझ्या मुंबईकर झोपडपट्टीयवासियांच्या घरांचा आणि दुकानांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांच्यावर टांगती तलवार असल्याने याबाबतची कारवाई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रस्तावित आहे. हे मुंबईकर या जागेवर वन घोषित होण्याआधी पासून राहत आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, डिक्शनरीच्या व्याख्येप्रमाणे येथे वन (जंगल) नाही म्हणून सदर संपूर्ण भूभाग यावर या झोपडपट्टी आणि मुंबईचा राहतात तो पूर्ण विभाग आणि जागा वनातून वगळण्यात यावा असा ठराव जिल्हा नियोजन समितीने पारित केला.

या पुनर्विकासाच्या बाबतीत हा विषय घेऊन आम्ही सगळे गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ती जागा वन अघोषित करावी यामध्ये संपूर्ण ८० हजाराच्या वर वनविभागातील झोपड्यातील मुंबईकरांचं पुनर्विकास व्हावा या पद्धतीच्या प्रस्तावाची भूमिका मंजुरी दिली. आता त्याला सर्वोच्च न्यायालयात पुढे आणि केंद्रीय मंत्रालयासमोर पुढे बळ मिळवण्यासाठी लोकसभागाच्या स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ हा जनतेचा कार्यक्रम आज या ठिकाणी केला. लढा एकेक टप्प्यात आम्ही जिंकतो आहोत. मुंबईकर गरिबांच्या घराची लढाई भाजप लढते आम्ही त्याची विश्वास आहे, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech