प्रभाग क्र. ५ ड मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रमिला पाटील मैदानात;
३० वर्षांपासून तळागाळातील लोकांचे केले आहे काम – प्रमिला पाटील
कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. रॅली, प्रचार सभा तसेच नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. अशातच प्रभाग क्र. ५ ड मधून शिवसेना–भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रमिला पाटील शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. एक महिला आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून पार्श्वभूमी असलेल्या उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे.

शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असून विकासाच्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करताना प्रमिला पाटील म्हणाल्या की, महिलांसाठी कल्याणमध्ये मोठे प्रशासकीय रुग्णालय उभे करायचे आहे. तसेच महिला सक्षमीकरणावर लक्ष देणार आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रमिला पाटील यांनी सांगितले.