माजी पंतप्रधान इम्रान खान यांची ११ जूनला सुटका होणार?

0

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची ११ जून रोजी तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना जामीन मिळण्याची शक्यता असल्याचे या नेत्याने म्हटले आहे. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना १९० दशलक्ष पौंडांच्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावली गेली आहे. ही शिक्षा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका इम्रान खान यांच्यावतीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ११ जून रोजी सुनावणी होणार आहे. इम्रान खान २०२३ च्या ऑगस्टपासून अदियाला तुरुंगात असून त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यातील अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना जामीन मिळेल, अशी आशा पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष गोहर अली खान यांनी व्यक्त केली आहे.

११ जून हा दिवस इम्रान खान आणि बुशरा बिबी या दोघांसाठी महत्वाचा दिवस ठरण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय उत्तरदायी प्राधिकरणाने तयारीसाठी कालावधी मागून घेतल्याने इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अल-कादिर ट्रस्ट प्रकरणाची सुनावणी लांबणीवर टाकली होती. शनिवारपर्यंत इम्रान खान यांच्या सुटकेसाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. देशाला वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील पीटीआयच्या वतीने करण्यात आले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech