सोने दर १३०० रुपयांनी घसरुन ९६२०० रुपये तोळा

0

जळगाव : सोने चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली. काही दिवसापूर्वी १ लाख रुपयांवर गेलेले सोन्याचे दर आता खाली आले आहे. जळगाव सराफ बाजारात काल सोने दरात १३०० रुपयांनी घसरुन ९६२०० (जीएसटीसह ९९,०८६) रुपये तोळा झाले. यासोबतच चांदीही १ हजारांनी घसरुन प्रती १०६००० (जीएसटीसह १,०९,१८०) रुपये किलोवर स्थिरावली. दरम्यान इराण आणि इस्त्रायल यांच्यामधील युद्धाच्या काळात सोन्यासह चांदीचे दर वेगानं वाढत होते. मात्र, इराण- इस्त्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर सोन्याचे दर घसरत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर विनाजीएसटी ९९३०० रुपये प्रति तोळा इतका होता. तर चांदीचा दर १०७००० रुपये इतका होता. या आठवड्यात सोने दरात तब्बल ३ हजार रुपयांपेक्षा अधिकची घसरण झालीय.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech