जळगाव : शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एक गंभीर आरोप केले आहे.ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माझ्या सख्ख्या भाच्याला मंत्री गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागले असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
कुरुंदकर याच्यासोबत बोलण्यावरून आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्या सारख्यांनी माझ्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण ७ वर्ष कारागृहात काढावे लागले, असा आरोपच खडसे यांनी केला आहे. निर्दोष सुटून आल्यानंतर त्याने कारागृहाच्या ठिकाणी अतिशय नित्कृष्ट दर्जाचे जेवण कैद्यांना दिले जात असल्याचं आपल्याला सांगितले, असे यावेळी एकनाथ खडसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.