नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी सोहळ्याचे प्रस्थान श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथून पंढरपूरला येत्या १० तारखेला होणार असून त्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ संस्थांनचे पदाधिकारी पालखी तळांना भेट देत आहेत. पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम हा सातपूर येथे असल्याने सातपूर ग्रामस्थांशी आज ( रविवार ता.२५) चर्चा करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील सुमारे वीस वारकरी तसेच छोट्या-मोठ्या दिंड्या निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. पालखी सोहळ्याचे औचित्य साधून सातपूर ग्रामस्थांनी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सातपूर ग्रामस्थान तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पालखीचे स्वागत होणारा असून सातपूर मधील महिला वारकरी लेझीम पथक तसेच वेगवेगळ्या भजनांमधून वारकऱ्यांचे स्वागत करणार असल्याचेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. यावेळी निवृत्तीनाथ संस्थानाचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त अमर ठोंबरे, निलेश गाढवे, पालखी सोहळा प्रमुख नवनाथ गांगुर्डे , चोपदार सागर दौंड तसेच सातपूर ग्रामस्थांपैकी किशोर मुंदडा, बाळा निगळ, आदींसह मान्यवर उपस्थित होते.