शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले सांत्वन

0

रोख स्वरूपात पाच लाखांची मदत कुटुंबीयांना सुपूर्द

अहिल्यानगर : शहीद संदीप गायकर यांच्या ब्राम्हणवाडा गावी त्यांच्या कुटुंबीयांची उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शहीद संदीप गायकर कुटुंबाला रोख पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.

उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर तसेच त्यांच्या माता-पित्यांकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, पदाधिकारी राम रेपाळे, बाजीराव दराडे, एकनाथ यादव तसेच ब्राम्हणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आदी उपस्थित होते.

शहीदाच्या कुटुंबाशी संवाद साधताना डॉ. उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत गायकर कुटुंबाला मानसिक आधार दिला.शहीदाचे बलिदान देश विसरणार नाही.त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे राज्य शासन नेहमीच उभी राहील,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech