उद्धव ठाकरेंनी भूम तालुक्यातील पाथरूड येथील शेतकऱ्यांशी साधला संवाद

0

धाराशिव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूम तालुक्यातील पाथरूड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दगाबाज महायुती सरकारने घोषित केलेली अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली की नाही याची माहिती शेतकरी बांधवांकडून जाणून घेतली. मराठवाड्यातील शेतकरी राजा इतिहासात कधी नव्हे एवढ्या मोठ्या संकटात पिचला गेला आहे. पॅकेजच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा लावली आहे, हे दुर्दैव आहे. या कठीण काळात आपण शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली. हे सरकार ना शेतकऱ्याशी प्रामाणिक राहिलं, ना आपल्या लाडक्या बहिणीशी त्यामुळे आता प्रत्येकाने एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे, दिलीप शाळू, मेघराज पाटील आदींसह आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech