संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यातील १५ वर्षीय वारकऱ्याचा नीरा नदीत बुडून मृत्यू

0

सोलापूर : जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. १) सकाळी नीरा नदीत आंघोळीसाठी गेलेला जालना जिल्ह्यातील एका १५ वर्षीय वारकरी मुलाचा नीरा नदीत बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. यामुळे तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्याचा शोध घेण्यासाठी वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गोविंद फोके असं वाहून गेलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तो १५ वर्षाचा आहे. आजी सोबत पंढरीच्या वारीसाठी १५ वर्षांचा गोविंद आला होता. नीरा नदीत पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्याने तो वाहून गेला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिरपी गावातील तो होता. एका होमगार्ड त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाहून गेला. त्याचा मृतदेह शोधण्यात यावा, या मागणीसाठी वारकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

नदीत बुडालेल्या गोंविदचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी वारकऱ्यांनी प्रशासनाकडे केली. वारकऱ्यांनी सराटीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू, असा पवित्रा घेत वारकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला.त्यानंतर आता एन डी आर एफ आणि अग्निशमन पोलिस मुलाचा तपास करत आहेत. सोमवारी ३० जूनला इंदापूर तालुक्यातील सराटी गावात पालखी मुक्कामी विसावला होता. आज मंगळवारी १ जुलै रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी देहू संस्थांच्या वतीने व स्थानिक प्रमुख ग्रामस्थ, मान्यवरांच्या हस्ते नीरा नदी पात्रात पादुकांना शाही स्नान घालण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech