संत तुकाराम महाराज पालखीचा बोपोडीत २५ मिनिटे विसावा

0

पुणे : पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या उपनगरातील भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ वाढवून २५ मिनिटांची करण्यात आली आहे. माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या विनंतीला मान देऊन संत तुकाराम महाराज संस्थानने विसाव्याचा वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात मुक्काम करणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ अत्यल्प असल्याने पालखीच्या दर्शनाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनेक भाविकांचा हिरमोड होत असे. त्यांची अडचण लक्षात घेऊन माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी विसाव्याची वेळ वाढविण्याची विनंती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्याकडे केली. त्याला त्वरित प्रतिसाद देऊन ही वेळ २५ मिनिटांपर्यंत वाढवित असल्याची ग्वाही मोरे महाराज यांनी दिली. त्यामुळे खडकी, औंध, बोपोडी, बाणेर, रेंजहिल्स या उपनगरातील भाविकांना शांतपणे पालखीचे दर्शन घेता येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech