सोलापूर : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांना नुकतेच जिल्हाध्यक्ष पदावरून परस्पर हटविले होते. तसेच मोहिते पाटील समर्थक असणारे वसंत नाना देशमुख यांची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. हा निर्णय परस्पर झाल्याने बळीराम साठे यांना हा निर्णय रुचला नाही. याच पार्श्वभूमीवर नुकताच त्यांनी वडाळा येथे कार्यकर्ता मेळावा घेऊन या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
विश्वासात न घेता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परस्पर रित्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले व नवीन नियुक्ती करतानाही कुठलीही विचारणा न करता परस्पर निर्णय घेतला. यामुळे उत्तर सोलापूर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची मधील बळीराम काका साठे समर्थकांनी तीव्र शब्दात आजपाखड केली होती. यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकण्याची तयारी काकांनी केली आहे. गेल्या दोन दिवस चाललेल्या या राजकीय घडामोडीवर शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय पाटील – घाटणेकर यांनी बळीराम साठे यांची भेट घेतली. त्यांचे मत जाणून घेतले आणि बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली.