सोलापूर विद्यापीठाचा भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार

0

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केंद्र सरकारच्या मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आकृती केंद्राशी सामंजस्य करार केला आहे. यामुळे विद्यापीठाशी संलग्न असणार्‍या विद्यार्थ्यांना भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केलेल्या दोनशेहून अधिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर येथील विद्यार्थ्यांना अणुसंशोधन केंद्रामध्ये प्रकल्प करण्याबरोबरच प्रशिक्षणही मिळणार आहे. या करारावर दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत कराराचा कार्यक्रम झाला. यावेळी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वैज्ञानिक अधिकारी तथा आकृती ग्रुपच्या लीडर भारती भालेराव, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. अंजना लावंड उपस्थित होते.

या कराराचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा सांगितले.अन्न, कृषी, पाणी, औषधे, अभियांत्रिकी आदी क्षेत्राशी संलग्न समाज उपयोगी २०० हून अधिक तंत्रज्ञान भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केले आहे. या विकसित तंत्रज्ञानाचा वापर व उपयोग आता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना करता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यासही विद्यार्थ्यांना करता येणार आहे. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट, ट्रेनिंग तसेच व्यवसायासाठी परवानगीही भाभा अणुसंशोधन केंद्राकडून मिळणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech