ताडोबाच्या बफर झोनमध्ये वाघीण मृतावस्थेत आढळली

0

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील मुल वनपरिक्षेत्रात वाघीण मृतावस्थेत आढळली. सदर घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. वाघिणीचा मृत्यू हा २४ तासांपूर्वी झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. बफर झोन मधील मुल वनपरिक्षेत्रात पर्यटक सकाळ सफारीत पर्यटन करीत असतांना वाघीण मृतावस्थेत आढळली. याबाबतची माहिती त्यांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. सदर घटनेची माहिती वनविभागाच्या वरिष्ठांना मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले.

यावेळी वनाधिकाऱ्यांसह राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी बंडू धोतरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रतिनिधी मुकेश भांदककर हे प्रामुख्याने उपस्थित होते. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असून शिकारीची शक्यता सूत्रांनी फेटाळून लावली. वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. यावेळी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चंद्रपूर येथील टीटीसी केंद्रात शवविच्छेदन केले. वाघिणीचे वय सुमारे सहा वर्ष असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech