गुरुकुंजात तस्करांचा धुमाकूळ राष्ट्रसंतांच्या आश्रमातील चंदनाची झाडे कापली

0

अमरावती : अमरावती  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील मध्यवर्ती कार्यालयाच्या परीसरातील चंदनाची झाडे कापून त्यातील गाभा-फळविण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी निदर्शनास आला.गुरुकुंज आश्रमातील चंदनाच्या झाडांना चंदन तस्करांनी लक्ष्य केले. आश्रम परिसरात सहा ते सात चंदनाच्या झाडांपैकी तीन झाडांना चंदन तस्करांनी आरी व कटरने कापले त्यातील एका झाडाला कटरच्या साहाय्याने कापून यातील गाभा काढून नेण्यात आला आहे. या प्रकरणी चंदन तस्करांचा शोध घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळाकडून करण्यात आली आहे.

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांनी स्थापलेला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ सेवाभावी संस्था व आश्रम असून या आश्रम परिसरात विविध प्रकारचीझाडे लावण्यात आली आहेत. त्यात सहा है सात चंदनाच्या झाडांचा समावेश आहे. त्यातीलच एका चंदनाच्या झाडाला तस्करांनी कटरमशीनने कापून त्यातील गाभा काढून नेण्यात आल्याचे गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास निदर्शनास आले.बुधवारी मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास चंदनाच्या झाडाला लक्ष करण्यात आलेले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech