अमरावती : लांबट आणि गोल आकाराची जांभूळ ही चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभूळ बाजारात दाखल होतात. सध्या अकोला शहरातील बाजारात जांभळाची आवक सुरू झाली आहे. पण यावर्षी हंगामाच्या सुरुवातीस आवक कमी असल्याने दरही चढेच आहेत. एक किलोसाठी चारशे रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र खरेदी करण्याऐवजी दर विचारून बाजारातून काढत पाय घेत असल्याचे चित्र सध्या आहे.
सध्या जांभूळ या फळाची अमरावतीच्या बाजारात आवक सुरू झाली आहे. मात्र, पाऊस वाढेल, तसतशी या फळाची आवक जास्त प्रमाणात बाजारात वाढेल आणि दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, असे विक्रेत्यांनी सांगितले. पावसाळ्यात, काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळे मिळतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरात अमृतासमान कार्य करते. वर्षांऋतूत जांभूळ महत्वाचे फळ मानले जाते. गोल, लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी जांभळं खाण्यामुळे आपण आरोग्य चांगले ठेवू शकतो.
सध्या मध्य प्रदेशातून मालाची आवक शहरातील बाजारात रसरशीत जांभूळ दाखल झालेली आहेत. उन्हाळ्यातील फळांमध्ये जांभुळ ही एक लोकप्रिय फळ आहे. सध्या जांभूळ या फळाची बाजारात आवक सुरू झाली आहे. मात्र, पाऊस वाढेल तसतशी या फळाची आवक जास्त प्रमाणात बाजारात वाढत असते. जांभूळ या फळाचा कालावधी दोन ते अडीच महिन्याचा असतो. निसर्गाचा लहरीपणा, घटते पर्जन्यमान, वाढती वृक्षतोड यामुळे जांभळाच्या किमती वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या ४०० रुपये प्रति किलो या भावाने बाजारत जांभळाची विक्री होत आहे.