नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान श्वानाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

छत्तीसगड : छत्तीसगडच्या करेगुट्टा हिल्स भागात नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान सीआरपीएफचा प्रशिक्षित श्वान K9 रोलो शहीद झाला. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहिमेदरम्यान अचानक मधमाशांच्या थव्याने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्याला वाचवता आलं नाही. रोलोचा जन्म एप्रिल २०२३ मध्ये झाला होता. स्फोटक शोधणे, गस्त आणि हल्ल्याचं प्रशिक्षण घेऊन तो एप्रिल २०२४ मध्ये २२८ बीएनमध्ये तैनात झाला होता. मोहिमेदरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल सीआरपीएफच्या महासंचालकांनी श्वानाला मरणोत्तर प्रशंसा पदक प्रदान केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech