छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे भव्य पुतळा उभारला जाणार

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नागपूर / विशेष प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) नवीन आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असून त्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.आराखड्यानुसार येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला नकार दर्शविल्याचा उल्लेख शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उत्तर जुना आराखडा लक्षात घेऊन लोकसभेत देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक हे आपले अभिमानाचे स्थान आहे. याठिकाणी पुतळा उभारण्याची मागणी पूर्वीही करण्यात आली होती. त्यावेळी या संदर्भातील आराखडा तयार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अलीकडे लोकसभेत आलेले उत्तर हे जुन्या आराखड्याशी संबंधित असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech