नाशिक : विरोधी पक्षांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करण्याची रणनीती भारतीय जनता पार्टीने आखली आहे. त्यामुळे आपल्याला सावध भूमिका घ्यावी लागेल. सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही तसेब शेतमालाला भाव नाही. शेतकरी हा सुलतानी, अस्थानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित नाशिकमध्ये लवकरच महामोर्चा काढला जाईल, अशी घोषणा शरद पवार गटाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. दरम्यान या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई नाका येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात कार्यकर्ता सुसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर शिंदे हे प्रथमच नाशिकमध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष सुनील भुसारा, शहराध्यक्ष गजानन शेलार जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, उदय सांगळे,माजी आमदार दीपिका चव्हाण, माणिकराव शिंदे नाशिक जिल्हा प्रभारी, आमदार सूनिलजी भुसारा,शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय अण्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, सर्व सेल जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विधानसभा व विभाग अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, राज्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. केवळ महामार्ग तयार करून विकास होत नसती. पशु खाद्यवर देखील जीएसटी आकारला जात असून, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या सरकारलाशेतक-यांच्ची ताकद दाखून देण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी नाशिकमध्ये लवकरच महामोर्चा काढू अशी घोषणा शिंदे यांनी यावेळी केली. यासाठी लगेच तयारीला लागण्याच्या सूचना शिंदे यांनी पदाधिका-यांना यावेळी दिल्यापुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी बैठकीतील निर्णयशेतकरी महामोर्चा आयोजन, मजूर, कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी मालेगावात मोर्चा, आंदोलन, युवक युवतींनी आक्रमक फली उभारणार, स्थानिकांना नौकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार तसेच पक्ष बळकट करण्यासाठी आपण हेवेदावे विसरून, यापुढे संघटीतपणे काम करू प्रामाणिक आणि निष्ठत्वान असणा-या कार्यकत्यांचाच येणाऱ्या निडणुकीत विचार केला जाईल, असे सांगतानाच सौभपुरते पदे उपभोगणाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दखवणार, असे संकेत शिंदे यांनी यावेळी दिले.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याची इच्छा आहे याबाबत मित्र पक्षांची अधिक चर्चा करावी नंतर निर्णय घेतले जातील पण ही निवडणूक स्वबळावर लढावी अशी देखील इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे नाशिकमध्ये आल्यानंतर या बैठकीत पक्षात सुरू असलेली नाराजीची भूमिका ही अनेक कार्यकर्त्यांनी मांडली स्वतः पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी माझी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यशैली वरती आक्षेप घेत असे वागले तर पक्षात कोण राहील असा प्रश्न उपस्थित केला आणि एका कार्यकर्त्यांनी तर स्थानिक नेते मंडळींसह प्रदेश पातळीवरील नेत्यांना देखील खडे बोल सुनावले हा कार्यकर्ता म्हणाला की आत्तापर्यंत पक्षाच्या आंदोलनात किती नेते सहभागी झाले हे सर्वांसमोर विचारा म्हणजे कोण खरं कोण खोटं हे समोरील कार्यकर्ते म्हणजे आता फक्त गर्दी जमवण्यासाठी लागतात असा स्पष्ट प्रश्न देखील त्याने यावेळी उपस्थित केला.