पावसाळी अधिवेशन राष्ट्रगौरव आणि विजयोत्सव साजरा करण्याचे सत्र – पंतप्रधान

0

नवी दिल्ली : हे पावसाळी अधिवेशन देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवशाली ठरणार आहे. या सत्रात राष्ट्रगौरव आणि विजयोत्सव साजरा करण्याचे हे सत्र आहे, या जल्लोषात एकसुराने सहभागी होऊया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. संपूर्ण जगात भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचे रुप दिसले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने जे लक्ष्य ठरवले होते ते १०० टक्के पूर्ण केले. आतंकवाद्यांच्या आकांना २२ मिनिटात ऑपरेशन सिंदूरमधून जमीनदोस्त केले, असेही ते म्हणाले. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले.

मोदी पुढे म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेसाठी पाऊस खूप महत्त्वाचा आहे. येत्या काळात देशाला त्याचा फायदा होईल. मान्सून हा नवोपक्रम आणि नवनिर्मितीचे प्रतीक आहे. आतापर्यंतच्या बातम्यांनुसार, देशात हा हंगाम खूप चांगला सुरू आहे. शेतीसाठी फायदेशीर हंगामाचे वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेत, देशाच्या अर्थव्यवस्थेत, ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत पाऊस महत्त्वाचा आहे. गेल्या १० वर्षांपेक्षा यावेळी ३ पट जास्त पाणीसाठा आहे, यामुळे येत्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, २२ मिनिटांत, दहशतवाद्यांच्या मालकांची घरे जमीनदोस्त करण्यात आली. मेड इन इंडिया लष्करी शक्तीच्या या नवीन स्वरूपाकडे जग खूप आकर्षित झाले आहे. आजकाल, जेव्हा जेव्हा मी जगातील लोकांना भेटतो तेव्हा भारताने बनवलेल्या मेड इन इंडिया शस्त्रांबद्दल जगाचे आकर्षण वाढत आहे, असंही मोदी म्हणाले. २०१४ पूर्वी आपण जागतिक अर्थव्यवस्थेत १० व्या क्रमांकावर होतो, आज आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. आज २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर पडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

आज आपले सुरक्षा दल नक्षलवाद संपवण्यासाठी एका नवीन आत्मविश्वासाने आणि संकल्पाने पुढे जात आहेत. अनेक जिल्हे नक्षलवादापासून मुक्त आहेत. देशात माओवाद आणि नक्षलवादाची व्याप्ती कमी होत आहे. आपल्या देशाचे संविधान बंदुकीसमोर जिंकत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पूर्वी रेड झोन असलेले झोन आता देशासाठी ग्रीन झोन बनत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech