दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी वेदमूर्ती देवव्रत महेश यांचे केले अभिनंदन

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे २००० मंत्र ५० दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला दंडक्रम पारायण असे म्हंटले जाते. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे वय फक्त १९ वर्षे असून त्यांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांची आठवण येणाऱ्या अनेक पिढ्या ठेवतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे, “ हे अद्वितीय कार्य काशीच्या पवित्र नगरीत पार पडले याचा काशी नगरीचा खासदार म्हणून मला खूप आनंद झाला आहे. त्याच्या कुटुंबियांना , तसेच त्याच्या पाठीशी असलेल्या देशभरातील साधू, संत, पंडित तसेच अनेक संस्थांना माझा प्रणाम !”

एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले, केवळ १९ वर्षे वयाच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी केलेल्या या कार्याची आठवण येणाऱ्या अनेक पिढ्या ठेवतील! भारतीय संस्कृतीविषयी प्रेम असणाऱ्या सर्वांना त्याने दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल त्याचा खूप अभिमान आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे २००० मंत्र ५० दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला दंडक्रम पारायण असे म्हंटले जाते. यात अनेक वैदिक मंत्र व ऋचा अचूक म्हणणे अपेक्षित असते. आपल्या उच्च गुणवत्तेच्या गुरु परंपरेचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे.हे अद्वितीय कार्य काशीच्या पवित्र नगरीत पार पडले याचा काशी नगरीचा खासदार म्हणून मला खूप आनंद झाला आहे. त्याच्या कुटुंबियांना, तसेच त्याच्या पाठीशी असलेल्या देशभरातील साधू, संत , पंडित तसेच अनेक संस्थांना माझे प्रणाम !

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech