काल्पनिक आकृतिबंध, नाट्यमय छायाचित्रे आणि फॅशनला प्राधान्य देणारी डिझाइन भाषा वापरून, तयार करण्यात आलेले ‘मृगांक’ सणासुदीच्या दागिन्यांमध्ये अचाट कल्पना आणि आश्चर्य भरते नागपूर ऑक्टोबर २०२५: भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहाचा एक भाग असलेल्या तनिष्कने पौराणिक आणि कल्पनारम्य जगापासून प्रेरित होऊन सणासुदीसाठी ‘मृगांक’ हे आकर्षक कलेक्शन प्रस्तुत केले आहे, जिथे तरंगते राजवाडे, आकाशीय उद्याने आणि अलौकिक प्राणी सोन्यात साकारले गेले आहेत. कथाकथनाची कला आणि सौंदर्य वाढविण्यासाठी प्रतीकांचा वापर शतकानुशतके भारतात केला जात आहे आणि मृगांकमधील प्रत्येक कलाकृती यापासून प्रेरित आहे आणि सणासुदीच्या भावनेचा सन्मान करते. धाडसी, कल्पनारम्य आणि आश्चर्यकारक अलौकिक – तनिष्कने माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर यांना मृगांकच्या या भावनेला मूर्त रूप देण्यासाठी निवडले आहे.
तनिष्कला ट्रेंडच्या पलीकडे जाऊन असे एक दृश्य जग निर्माण करायचे होते, जिथे प्रत्येक घटक, मग तो गूढ थ्रीडी पक्षी असो किंवा भव्य राजवाडा, आश्चर्याची भावना जागृत करेल. पौराणिक प्राणी आणि काल्पनिक फुलांनी प्रेरित होऊन, मृगांक कल्पनारम्यतेइतके सुंदर आणि स्वप्नांइतके भव्य असावे या भावनेतून डिझाइन केले आहे.
स्टोन-ऑन-स्टोन जडाऊ, बाडरूम, चांडक, रस रवा आणि गुंतागुंतीच्या जाळीच्या लेयर्सच्या प्रगत तंत्रांचा वापर करून तयार केलेल्या या कलेक्शनमध्ये रंगीबेरंगी कुंदन, मीनाकारी आणि थ्रीडी आकृतिबंधांचे सुंदर मिश्रण आहे. प्रत्येक दागिना म्हणजे एक प्रवेशद्वार आहे, जे परिधान करणाऱ्याला मृगांकच्या काल्पनिक जगात घेऊन जाते, जिथे मिथक आणि कलात्मकता यांची सांगड घातलेली असते. राजवाड्याची भव्यता प्रतिबिंबित करणारे कॅस्केडिंग हरम असोत, पौराणिक प्राण्यांपासून प्रेरित स्टेटमेंट रिंग असोत किंवा विविध शैलींनी डिझाइन केलेले बहुमुखी पेंडेंट सेट असोत, तनिष्कचे मृगांक कलेक्शन एक वैविध्यपूर्ण परंतु सुसंवादी अनुभव देते, आधुनिक भारतीय महिलेसाठी सणासुदीच्या दागिन्यांची नवी व्याख्या रचते.
मृगांक हे तनिष्कच्या कल्पनाशक्तीला परिधान करता येईल अशा कलात्मकतेमध्ये रूपांतरित करण्याच्या अद्वितीय क्षमतेचे उदाहरण आहे, जिथे कारागिरी आणि कथाकथनाची जादू एकत्रितपणे खरोखर अलौकिक निर्मिती करते.
या कलेक्शनबद्दल, टायटन कंपनी लिमिटेडच्या चीफ डिझाईन ऑफिसर श्रीमती रेवती कांत म्हणाल्या, “वर्षातील सर्वात मोठ्या सणांसाठी, ‘मृगांक’ हा स्वप्नांच्या कल्पनारम्य जगाचा एक भव्य उत्सव म्हणून सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे कलेक्शन भारतीय कथा आणि कथाकथनाच्या समृद्ध वारशाने सजलेला आहे. याची जडणघडण जादुई जगामध्ये करण्यात आली आहे, जिथे ढगांमधून डोकावणारे भव्य राजवाडे, सुंदर गूढ प्राणी आणि दुसऱ्या जगातील दुर्मिळ फुले सोन्यात साकारली गेली आहेत. गुंतागुंतीच्या कलात्मकतेने रचलेल्या प्रत्येक दागिन्यामध्ये एक गूढ आकर्षण आहे; कुंदनची भव्य चमक, रंगीत स्टोन्स आणि इनॅमल अॅक्सेंटपासून ते शिल्पात्मक थ्रीडी फॉर्म आणि लेयर्ड पोतांपर्यंत, या जादुई जगाचे सौंदर्य धाडसी, अभिव्यक्तीपूर्ण आणि फॅशन-फॉरवर्ड दागिन्यांमध्ये साकारण्यात आले आहे. तनिष्कची सखोल डिझाइन कौशल्ये, नाजूक कारागिरीचा वारसा आणि सर्जनशील दृष्टीमुळेच ‘मृगांक’ मध्ये काल्पनिक विश्वाचे परिधान करण्यायोग्य कलेमध्ये रूपांतर होऊ शकले आहे. उत्सवाच्या अनुभवाला आनंद, सौंदर्य आणि विस्मयाने भरून टाकणाऱ्या विस्मयकारी जगात येण्याचे आमंत्रण म्हणजे ‘मृगांक’ सर्व इंद्रियांना आनंदाची अनुभूती देण्यासाठी आणि आधुनिक उत्सवांच्या विविध अभिव्यक्ती साजऱ्या करण्यासाठी तयार केले गेले आहे.”
तनिष्कमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे डिझाइन आणि अर्थाचे विशिष्ट मिश्रण प्रतिबिंबित करणारे, ‘मृगांक’ विविध किंमतींचे दागिने सादर करते. भेट म्हणून देण्यासाठी असो किंवा स्वतःसाठी, मृगांक महिलांना दिवाळी साजरी करण्यासाठी असे दागिने देत आहे, जे कालातीत, अर्थपूर्ण आणि मौल्यवान आहेत.