लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन ट्रॉफ असे नाव देण्यात आले आहे. आता तेंडलुकर-अँडरसन ट्रॉफी दोन्ही देशांमधील भविष्यातील कसोटी मालिकेत खेळवली जाईल.इंग्लंड अँड वेल्स बोर्डानेनवीन ट्रॉफीचे अनावरण मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडलुकर आणि जेम्स अँडरसनच्या हस्ते केले.
या ट्रॉफीवर तेंडुलकर आणि अँडरसन दोघांचीही प्रतिमा आहेत. त्याचप्रमाणे या दोघांच्या सह्यादेखील या ट्रॉफीवर आहेत. पतौडी कुटुंब, ज्यांच्या नावावर मागील पतौडी ट्रॉफी ठेवण्यात आली होती. मात्र, आता विजेत्या कर्णधाराला पतौडी पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. “माझ्यासाठी, कसोटी क्रिकेट सर्वस्व आहे. तुम्ही तुमचे सर्वोत्तम कसोटी क्रिकेटमध्ये देता आणि जर काही चूक झाली तर ते तुम्हाला पुन्हा एकत्र येत विचार करण्यासाठी आणि परत नवी उभारी घेण्यासाठी आणखी एक दिवस देते,” असं मत सचिन तेंडलुकरने या ट्रॉफीच्या अनावरणादरम्यान व्यक्त केलं आहे.