BWF वर्ल्ड टूर फायनल्स : रोमांचक उपांत्य फेरीत सात्विक-चिरागचा चिनी जोडीकडून पराभव

0

हांगझोऊ : भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांच्याकडून पराभव पत्करल्यानंतर BWF वर्ल्ड टूर फायनल्समधून बाहेर पडली. भारतीय जोडीने पहिला गेम २१-१० असा जिंकून चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्यांना ही लय कायम राखता आली नाही. एक तास आणि तीन मिनिटे चाललेल्या रोमांचक उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांना २१-१०, १७-२१, १३-२१ असा पराभव सहन करावा लागला.

सात्विक आणि चिरागने गट टप्प्यात याच चिनी जोडीला पराभूत करण्याची किमया साधली होती. पण उपांत्य फेरीत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी महत्त्वाच्या क्षणी चांगला खेळ करून सामन्यात विजयश्री मिळवली. भारतीय जोडी या प्रतिष्ठित स्पर्धेच्या गट टप्प्यात अपराजित राहिली होती. पण उपांत्य फेरीतील सामन्यात झालेल्या पराभवामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी होण्याचा मान मिळवण्यात अपयश आल आहें. दरम्यान, सात्विक आणि चिराग यांनी हंगामातील शेवटच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला होता. आणि BWF वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech