इंग्लंड संघाविरुद्धच्या सामन्यांमधून कर्णधार शुभमन गिलची अचानक माघार

0

मुंबई : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियाचा कसोटी संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना २० जूनपासून सुरू होणार आहे. तर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ३१ जुलैपासून खेळला जाणार आहे. भारताच्या निवड समितीने या दौऱ्यासाठी मागच्या आठवड्यात संघ निवडला आहे.शुभमन गिलला या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. परंतु गिल या दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. त्याने या दोन सामन्यांसाठी आपले नाव मागे घेतले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारत अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन चार दिवसीय सामने खेळणार आहे. या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणाही करण्यात आली आहे. शुभमन गिल इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता आणि आता त्याने दुसऱ्या सामन्यातूनही आपले नाव मागे घेतले आहे.या मागचे कारण समोर आले आहे. गिलला इंग्लंडच्या मुख्य संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील पहिला सामना ३० मे ते २ जून दरम्यान आणि दुसरा सामना ६ ते ९ जून दरम्यान खेळला जाणार आहे. अभिमन्यू ईश्वरनला इंडिया अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अभिमन्यूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अभिमन्यूला भारतीय संघातही संधी देण्यात आली आहे. या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा कोणताही खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतो.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech